Total Pageviews

Saturday, July 23, 2016

पुस्तक दिनासाठी...
एका कवीने कविता लिहिलीच नाही
कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर.
कागद काळे करण्यापेक्षा वडाचं
एक झाड लावू असं ठरवलं त्याने.
दरम्यान
समकालीन कवितेत खूप पिक आलं
प्रायोगिक वगैरे कवितांचं.
त्याच्या वडाची दखल मात्र
कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही.
समकालीन कविता तिसऱ्या दिवशी
फुटाण्याच्या पुडी साठी शहीद झाली.
वड मात्र हिरवागार आहे अजूनही
रोज पक्ष्यांचं संमेलन भरतं न चुकता.
वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो
हे आपलं पुस्तक आहे.
लोक हसतात आणि म्हणतात
ह्याला काही सुचत नाही.
कवी झाडाखाली वाचत असतो
हजारो पुस्तकं.
कधी
अचानक सुचल्यासारखा कवी उठतो
आता कविता लिहिणार असं वाटतं.
पण कवी जातो बांधावर
आणि लावतो आणखी एक झाड.
गावात त्याला कुणी कवी म्हणत नाही
कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही.
पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर
सुरु झाली पक्षांची किलबिल
तर नीट लक्ष देऊन ऐका
तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल.
कवी झाडाला पुस्तक म्हणतो
कारण त्या पानांमध्ये
खूपकाही देण्याची ताकद आहे.
ही पानं वाळायच्या आत
चाळायला हवीत.
हिरव्यागार कवितेसाठी.
पुस्तक दिनासाठी...
एका कवीने कविता लिहिलीच नाही
कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर.
कागद काळे करण्यापेक्षा वडाचं
एक झाड लावू असं ठरवलं त्याने.
दरम्यान
समकालीन कवितेत खूप पिक आलं
प्रायोगिक वगैरे कवितांचं.
त्याच्या वडाची दखल मात्र
कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही.
समकालीन कविता तिसऱ्या दिवशी
फुटाण्याच्या पुडी साठी शहीद झाली.
वड मात्र हिरवागार आहे अजूनही
रोज पक्ष्यांचं संमेलन भरतं न चुकता.
वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो
हे आपलं पुस्तक आहे.
लोक हसतात आणि म्हणतात
ह्याला काही सुचत नाही.
कवी झाडाखाली वाचत असतो
हजारो पुस्तकं.
कधी
अचानक सुचल्यासारखा कवी उठतो
आता कविता लिहिणार असं वाटतं.
पण कवी जातो बांधावर
आणि लावतो आणखी एक झाड.
गावात त्याला कुणी कवी म्हणत नाही
कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही.
पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर
सुरु झाली पक्षांची किलबिल
तर नीट लक्ष देऊन ऐका
तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल.
कवी झाडाला पुस्तक म्हणतो
कारण त्या पानांमध्ये
खूपकाही देण्याची ताकद आहे.
ही पानं वाळायच्या आत
चाळायला हवीत.
हिरव्यागार कवितेसाठी.
- - अरविंद जगताप.

2 comments: