अजूनही एखादी महिला या पुरोगामी महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली नाही. प्रवेश मिळवायचा तर तिथे मिळवा. मुख्यमंत्री म्हणून. मुख्यमंत्र्याची बायको म्हणून नाही. शनी शिंगणापूर मंदिरात जाऊन अशी कोणती क्रांती होणार आहे? शनीने कुठे तुम्हाला कधी विरोध केलाय? हुंडा देऊन जो राशीत मंगळ भेटलाय तुम्हाला त्याचं पाप आहे सगळं. ज्या वंशाच्या दिव्यासाठी नवस केले त्याच्यामुळे अंधार आहे बघा हा. आईने एखाद्या देवळात जाऊ नये असं ज्या मुलाला वाटतं त्याला लहानपणीच एखाद्या देवळाच्या दारात सोडलं पाहिजे होतं तुम्ही. त्याचं हगणं मुतनं करण्यात का घालवले आयुष्यातले महत्वाचे वर्ष? ज्याला धुवायचं शिकवलं तो तुम्हाला कोणत्या देवाला शिवायचं हे शिकवणार? किती हास्यास्पद आहे. आता तरी विरक्त व्हा. किती दिवस वाती वळायच्या आया बायांनो? आता वात पेटवायची वेळ आलीय. पण देवळात नाही. नाहीतर होणार काय? करून गेला गाव आन देवाचं आलं नाव.
No comments:
Post a Comment