Total Pageviews

Saturday, July 23, 2016

नेमाडे

नेमाडे सर...

लिहिण्याची समृध्द अडचण.
नकार मिळणार हे ठाऊक असून 
पिछाच पुरवावा तिचा
तसं काहीसं तुमच्या बाबतीत..
एक पान जरी वाचलं तर
बरेच दिवस लिहावं वाटत नाही
हे ठाऊक असून सुद्धा
मी वाचतोच तुम्हाला.
मला ठाऊक आहे माझ्या शब्दांपेक्षा असतो
कॉम्प्यूटरच्या बटनाचा आवाज जास्त लक्षवेधी.
खरंतर भिडतात माझेही शब्द
दूधवाला, केबलवाला आणि घरमालकाच्या खिशाशी.
तरीही मी लिहितो कारण
जगात काय फक्त एकटा ताजमहाल आहे?
बिविका मकबरा पण आहेच की.
पण कधी सापडेल तुमच्या सारखी एखादीच ओळ
उदाहरणार्थ
' कशा रांगोळ्या काढता तुम्ही, घरंदाज व्यथांनो!'
-- अरविंद जगताप.

No comments:

Post a Comment