पहिल्या दिवसापासून दोघांचं तोंड दोन दिशेला होतं. नवरा प्रचंड आनंदी. बायको मात्र जाहीर वाभाडे काढतेय रोज. नवरा आनंदी आणि बायको नाराज असताना पहिल्यांदाच एखाद्या संसाराची वर्षपूर्ती साजरी झाली. बायको असमाधानी असताना सुखी असणारा नवरा एकतर बाहेरख्याली असतो. म्हणजे बायको समोर असताना तो सारखा ‘घड्याळात’ बघतो कारण त्याने कुणाला तरी वेळ दिलेली असते. पण बायकोने जर स्वार्थाशिवाय फक्त गंमत म्हणून कुणाचा ‘हात’ धरला तर ? बरं नॉर्मली वर्ष झाल्यावर आपल्याकडे विचारायला सुरुवात होते, काही गोड बातमी? पण इकडे ती सोय नाही. नवऱ्याला आता लक्षात आलंय की घड्याळ कितीही लूज असलं तरी हाताला लटकून रहायचं. आपण पडलो गायी सांभाळणारे. वाघाशी संसार आपल्याला झेपणार नाही. दात मोजायची भाषा केली तर आता ब्रश पण करून द्या म्हणणारी बायको आहे आपली. एकूण काय तर हा संसार इतक्यात गोड बातमी देणार नाही. पण भरपूर मनोरंजन करणार आहे.
No comments:
Post a Comment