ती खूपच सच्ची!
ती आपल्याला आवडते म्हणून सुद्धा आपण आवडतो बायकोला.
ती आपल्याला आवडते असं सांगितल्यावर लोक जरा बरं बघतात आपल्याकडे सुद्धा. ती बोल्ड नव्हती असं नाही. पण आपल्याला नेहमी डीसेंट ठेवलं तिच्या अभिनयाने. तिला बघितलं की खूप पॉझिटिव्ह होतो आपण. एकच निगेटिव गोष्ट आहे तिच्या बाबतीत. राज बब्बर. आता हे बोलायची गरज आहे का? पण तिची एवढी एकच गोष्ट आवडली नाही! आपल्याला साला अभिनय पण करता येत नाही सगळं छान छान बोलायचा. पण स्मिता पाटील चळवळीतली. भटक्या विमुक्तांसाठी पण काम केलंय. गाजावाजा न करता. मी डोळ्यांनी बघितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण डोळे एवढे बोलके असू शकतात यावर माझा अजूनही विश्वास नाही. मी असे डोळे अजून पाहिले नाहीत. मिस यु स्मिता पाटील! -- अरविंद जगताप.
No comments:
Post a Comment