तर इतिहास असं सांगतो की
मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून आंदोलन करणाऱ्या १०५ मराठी माणसांना गोळ्या घालण्यात आल्या. मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून जीव दिला त्यांनी. मग काही वर्षांनी त्यांच्या वंशज मराठी माणसांना काही लाखांसाठी मुंबई सोडावी लागली आणि कल्याण डोंबिवली विरारला घरं घ्यावी लागली. मराठी नेत्यांच्या भुक्कडपणामुळे. दरम्यान एक अतिशय वास्तववादी कलाकृती निर्माण झाली. त्याच जागी जिथे हे १०५ लोक गोळी लागून हुतात्मे झाले तिथेच हुतात्मा स्मारक म्हणून एक शेतकरी आणि एक कामगार असे दोघे एकत्र असलेलं शिल्प बसवलं गेलं. मराठी माणूस म्हणजे कोण? शेतकरी किंवा कामगार. ही एक कायच्या काय दूरदृष्टी त्या शिल्पात दिसते. असो. आजही शिल्प म्हणून का असेना दोन मराठी माणसांना त्या चर्चगेट जवळ हक्काची जागा आहे हे काय कमी आहे? जय महाराष्ट्र!
- अरविंद जगताप
No comments:
Post a Comment