Total Pageviews

Saturday, July 23, 2016

mumbai










तर एके ठिकाणी इतिहास असं सांगतो की पौर्तुगीज राजाच्या कार्टीचं लग्न इंग्लंडच्या राणीच्या कार्ट्याशी झालं. इथपर्यंत गुजरात गोष्टीत कुठच नव्हतं. मग लयीच आनंदात पौर्तुगीज राजाने जावयाला मुंबई नावाचं बेट आपल्या बापाचं असल्यासारखं हुंड्यात देऊन टाकलं. इथपर्यंत पण गुजरात गोष्टीत कुठच नव्हतं. पण लफडं असं झालं की पौर्तुगीज राजानी तरीपण आपला गव्हर्नर मुंबईत ठेवला. असावा म्हणून. इथपर्यंत पण गुजरात गोष्टीत कुठच नव्हतं. पण लोचा असा झाला की पौर्तुगीजांचा गव्हर्नर आणि इंग्लंडच्या राजघराण्याचा प्रतिनिधी मानपानावरून भांडायला लागले. रोज. मी मोठा का तू मोठा? आपल्या सेना बीजेपी सारखे. मग इंग्लंडच्या राजघराण्याला आला राग. ते म्हणाले बसा बोंबलत. त्यांनी मुंबई देऊन टाकली गुजरातमध्ये असलेल्या इंग्रजांच्या एका कंपनीला. भाडं ठरलं वर्षाला १० पौंड.
तुम्ही म्हणाल मग आम्ही काय करायचं ? आपण भाड्यानेच राहायचं हो. पण मुंबई भाड्याने द्यायची वेळ आली तर निदान आजच्या काळात भाडं किती भेटणार? त्याचा तर अंदाज बांधू.  - अरविंद जगताप.

No comments:

Post a Comment